Saturday, 25 April 2015

गुमतारा किल्ला

२४ एप्रिल २०१५

आज सर्व सायबरचे विद्यार्थी खूपच उत्साही होते,कारणही तसचं होत, सर्व विद्यार्थी १० वीची परीक्षा दिलेले आयुष्यातला पहिला ट्रेक करण्यासाठी तयार होते. ठिकाणही जवळचं निवडलं, “गुमतारा किल्ला”. सकाळी ७:३० ला आम्ही सर्वजन घोटगाव या पायथ्या जवळील गावातील दत्त मंदिरात जमलो,गावातून एक वाटाड्या घेतला आणि किल्ल्याच्या दिशेने निघालो. मुल पहिला ट्रेक करत आहेत न त्यात मुलींची संख्या जास्त त्यामुळे एक दडपण होत. किल्ल्यावर जाणारी पायवाट खूपच निसरडी आहे अस कळाल आणि मुलांची अजूनच काळजी वाटू लागली.
घोटारा किल्ला 

वेळ जात होती आणि सर्व मुल हळू हळू किल्ल्याच्या दिशेने सरकत होती. तीन डोंगर पार केल्यानंतर एक सपाट मैदान लागले. तिथे थोडावेळ आराम केला, अंगातली सर्व उर्मी जमा केली कारण आता खरी चढाई सुरु होणार होती. हो आम्ही किल्ल्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. किल्ल्याच्या मागच्या बाजूने आम्ही वर सरकत होतो. पायवाट चिंचोळी आणि अजूनच निसरडी होत चालली होती, एकमेकांना हात देत, २:३० तासांच्या अथक प्रयन्ताने शेवटी आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. मुलांच्या चेहेऱ्यावर एक प्रकारची भीती दिसर होती. मस्तपैकी एक चांगली जागा बघून सर्वांनी बैठक मारली. थोड्या वेळातच गप्पा सुरु झाल्या, जेवणाचे डब्बे उघडले गेले आणि भीतीला दूर सारून जेवण फस्त करायची शर्यत सुरु झाली. थोडावेळ आराम करून किल्ला बघायला गेलो.
विश्रांतीचा एक क्षण 
प्रतीचा प्रवासमात्र थोडा आरामदायक होता, सर्वांच्या पाठीवरच वजन थोड कमी झाल होत. सुरुवातील वाटणारी भीती कुठच्या कुठे पळाली होती, उतरताना किल्ल्याच्या खालच्या पठारावर खूप वेळ आराम केला. आता थोडेसे जोक्स मधेच गाणे सुरु झाले. सर्वांच्या चेहेऱ्यावर एक समाधान होत, आनंद होता आणि आमच्या मागे किल्ला तटस्थपणे आम्हाला बघत होता.

मोहीम फत्ते


किल्ल्याची माहिती :

हा किल्ला सुमारे ८०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आणि “पुरंदर तहात” ११ जून १६६५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना २१ इतर किल्ल्यांसोबत कोहीज किल्ला व गुमतारा दिला होता. असा उल्लेख आहे. याउपर जास्त माहिती नाही. किल्ल्यावर बघण्यासारखं काहीच उरलेल नाही, सर्व ठिकाणी भग्नावशेष दिसतात, काही ठिकाणी तटबंदी सुस्थितीत आहे, दोन बुरुज तुटलेल्या अवस्थेत आहेत. किल्ल्यावर ४ पाण्याची टाक आहेत परंतु त्यात माती जाऊन ती बुजलीत. बालेकिल्ल्यात छोटस देवीच मंदिर आहे, आणि इमारतींचे अवशेष आहेत. किल्ल्यावर पाणी नाही,परंतु मागच्या बाजूला किल्ल्याच्या खाली एका कातळाच्या कपारीत पिण्यायोग्य पाणी आहे परंतु येथे मधमाश्या असतात त्यांना न डिवचता तुम्ही पाणी घेऊ शकता.
टिप:

किल्ल्यावर जायचं असल्यास कमीत कमी ३ लिटर पाणी जवळ असणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment