Sunday, 11 September 2016

"कळसुबाई"


दि.०९ सप्टेंबर २०१६


शाळेत असताना शिकलो होतो कि, ‘कळसुबाई’ महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे आणि तेव्हापासून ‘कळसुबाई’ बद्दल आकर्षण होताच. काही महिन्यांपूर्वी कळसुबाई नाईट ट्रेक काही कारणांमुळे मला आणि अविनाशला मधूनच सोडवा लागला होता आणि तेव्हापासून मनात होत कि ‘कळसुबाई’ एकदा सर करायचच.


गणपतींच्या सुट्टीमध्ये निवांत वेळ मिळाला. मी आणि अविनाशने हा ट्रेक करायचं ठरवलं. शुक्रवार दि ०९ सप्टेंबर २०१६ ला सकाळी ७:३० ला आम्ही घरून निघालो. आणि कसारा घाट पार करून इगतपुरी नंतर साधारण १०:३० ला आम्ही “बारी” ह्या गावात पोहोचलो. शिखरावर जाण्यासाठी खूप वाटा आहेत परंतु सर्वात सोपी वाट हि “बारी” ह्या गावातून जाते. भंडारदरा ते बारी हे अंतर ६ किमी आहे. बारी गावापासून शिखरावर जाण्यासाठी जवळपास ३ तास लागतात. बारी गाव सोडल्यानंतर एक छोटासा ओढा लागतो तो ओलांडून जाणारी पायवाट पकडली कि ती सरळ आपल्याला कळसुबाई शिखरावर घेवून जाते. ट्रेक अतिशय साधा आहे परंतु उंची साधारणपणे ५४०० फुट असल्यामुळे बऱ्यापैकी दमछाक करणारा आहे.







कळसुबाईवर जाण्यासाठी ट्रेकर्स आणि भाविकांची सतत वर्दळ चालू असते त्यामुळे पायवाट चांगलीच मळलेली आहे. गाईड न घेताही अगदी आरामात तुम्ही हा ट्रेक करू शकता. शासनाच बऱ्यापैकी लक्ष इथे आहे. पायवाटेमध्ये काही ठिकाणी दगडी पायऱ्या आणि रेलीन्ग्स आहेत आणि तीन ठिकाणी लोखंडी शिड्या आहेत. शिड्यांवरून जाताना थोडस थ्रील अनुभवायला मिळत. थोड्या थोड्या अंतरावर लीम्बुपाण्याचे स्टोल्स आहेत यामुळे थोड थांबत आराम करत आपण शिखरावर कधी पोहोचतो ते कळतही नाही. जागो जागी वेगवेगळ्या फुलांचे ताटवे लक्ष वेधून घेतात. एक मात्र खर कि सह्याद्रीच्या कोणत्याही शिखरावर कधीही जा, प्रत्येक ऋतूत तो त्याच वेगळ रूप घेवून तुम्हाला खुनवायला तयार असतो. शेवटच्या लोखंडी शिडीपूर्वी एक दगडी विहिर लागते. उन्हाळ्यात तिच्यात पाणी असतं कि नाही ते मात्र कळल नाही.









२:३० तासांच्या चढाईनंतर आम्ही शिखरावर पोहोचलो. शिखरावर कळसुबाई देवीच छोटंसं ३-४ लोक बसू शकतील अस मंदिर आहे. तिथल्या पुजाऱ्याने आम्हाला कळसुबाई देवीची गोष्ट सांगितली आणि भविष्यात खूप मोठ मंदिर उभारण्याचा मानसही बोलून दाखवला.
अतिउंच असल्यामुळे शिखरावर सतत ढगांची रेलचेल होती. त्यामुळे आजूबाजूचा परिसर न्याहाळता आला नाही. परंतु जर धुकं किवा ढग नसतील तर मात्र भंडारदरा धरणाच पाणलोट क्षेत्र, अलंग, मदन, कुलंग, रतनगड इथून दिसतात.
एकदा तरी कळसुबाई कराच,त्याची उंची आणि राकटपणा अनुभवा. तुम्ही प्रेमात पडल सह्याद्रीच्या.

















सूचना : बारी गावात कारचे दरवाजात लोखंडी सळई टाकून दरवाजे उघडण्याचा प्रयत्न झालेला होता त्यामुळे बारी गावात कार पार्क करतांना सर्व खातरजमा करूनच कार उभी करा.

ट्रेक करा ! फिट रहा !!


11 comments:

  1. मस्त पण वरती कांदा पोहे आणि खजूर खाल्ले ते विसरलास का

    ReplyDelete
  2. मस्त पण वरती कांदा पोहे आणि खजूर खाल्ले ते विसरलास का

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा हा ... उतरताना त्याचीच तर एनर्जी मिळाली....

      Delete
  3. कधी तरी आम्हाला पण कळवा ट्रेक ला जाताना

    ReplyDelete
    Replies
    1. नेक्स्ट टाइम पक्का विजय.... 👍

      Delete
    2. नेक्स्ट टाइम पक्का विजय.... 👍

      Delete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. कधी तरी आम्हाला पण कळवा ट्रेक ला जाताना

    ReplyDelete
  6. कधी तरी आम्हाला पण कळवा ट्रेक ला जाताना

    ReplyDelete
  7. आम्ही आतुरतेने वाट बघतोय😊😊

    ReplyDelete
    Replies
    1. हो विजय, कधी कधी एक दिवस आधी प्लांनिंग होत त्यामुळे तुला कळवता येत नाही. त्याबद्दल sorry. परंतु एखादा प्री-प्लान ट्रेक असेल तर तुला अवर्जून सांगेन. तोपर्यंत तुझ्या भागातील तुझी भटकंती चालू ठेव... ट्रेक करा ! फिट रहा !!

      Delete