दि. ३१ जुलै २०१६
![]() |
| “कलावंतीण दुर्ग” : उंची 2300 फुट |
![]() |
| ग्रुप फोटो |
“कलावंतीण दुर्ग” हा
कोण्या राजाने म्हणे त्याच्या राणीसाठी बांधला होता. प्रेमामध्ये जर काही गिफ्ट
द्यायचं असेलच तर आपल्याला इतिहासाचा आधार घ्यायला हरकत नाही. मग तो ताजमहल असो
किवा कलावंतीण दुर्ग. अतिशय सुंदर भौगोलिक परिसर आणि कलात्मक पायऱ्या ह्यामुळे “कलावंतीण
दुर्ग” ट्रेकर्स मध्ये प्रिय आहे.
![]() |
| सेल्फीची मजाच काही और |
राजेश दादा कडून
“कलावंतीण”चा निरोप आला आणि त्याला नाही बोलू शकलो नाही. कलावंतीण दुर्गाबद्दल
असलेल आकर्षण,त्याची सुंदरता आणि खूप दिवसापासून ची इच्छा त्यामुळे राजेश दादाला
मी, अविनाशने लगेच होकार दिला. शिवाय मागील ट्रेक करून एक महिना उलटून गेला होता.
“सुमेरू टेक्कर्स” ह्या चार तरुण मुलांनी चालू केलेल्या टेक्किंग ग्रुप मधून आम्ही
नोंदणी केली. घरातून परवानगी मिळाली आणि चार दिवस आधीच तयारी सुरु केली. अखेर
रविवार उजाडला. सकाळी ७:३० ला पनवेलला पोहोचायचे असल्यामुळे पहाते ५:१५ वाजता
आम्ही घर सोडलं. “कलावंतीण” ला भेटण्यासाठी आम्ही खूपच उत्चूक होतो. राजेश दादा
आणि आरती ठाण्यामध्ये आमची वाट बघत होते त्याना सोबत घेतलं आणि पनवेल कडे प्रस्थान
केले. आरतीची आणि आमची तशी ओळख आजचीच परंतु ती खूपच मनमिळावू आहे. त्यामुळे
थोड्याच वेळात ती आमची मैत्रीण बनली.
![]() |
| “कलावंतीणच्या पायऱ्या" |
पनवेलमध्ये “सुमेरू”चा तुषार भेटला. खूप उत्साही व्यक्तीमत्त्व. चेहेरा
कायम हसरा आणि आत्मविश्वासाने भरलेला. तुषारने पनवेलमध्ये नाश्त्याची सोय केली होती,
गरमा-गरम कांदेपोहे आणि चहा. फ्रेश होऊन आम्ही पनवेलपासून १६ किमीवर असलेल्या “ठाकूरवाडी”
ह्या कलावंतीणच्या पायथ्याशी असलेल्या गावाकडे प्रस्थान केल. FM वर आशाच नभ उतरू
आलं वाजत होत आणि बाहेर पाऊस जणू २४ तासांचा रिचार्ज केल्याप्रमाणे कोसळत होता. २०
मिनिटांनी आम्ही ठाकूरवाडीला पोहोचलो. समोर प्रबळगड दिसत होता आणि त्याच्या डाव्या
बाजूने “कलावंतीण” आम्हाला खुणावत होती.
![]() |
![]() |
| मी, राजेश दा, अविनाश आणि आरती |
पुन्हा एकदा गरमा-गरम
चहा घेत निसर्ग अनुभवत होतो. समोर अंगावर येणार प्रबळगड, आणि स्वतःला खाली झोकून
देणारे असंख्य पांढरेशुभ्र धबधबे, मधेच येणारे ढग. सर्व काही अप्रतिम होत. काही
क्षण अस वाटून गेल कि “बाहुबली” इथेच तर नाही ना शूट झाला. २०-२५ मिनिटांत सर्व
ग्रुप मेंबर्स जमा झाले. आता तुषारने लीड घेतला होता, सर्वाना एकत्र गोळा करून महत्त्वाच्या
सूचना देवून ओळख परेड झाली आणि सर्वांनी कलावंतीणकडे कूच केली.
![]() |
| ढगांमध्ये लपलेला प्रबळगड |
कलावंतीणकडे जाणारी
वाट प्रशस्थ आहे आणि बऱ्यापैकी मळलेली आहे. ट्रेकर्सचा सतत राबता असतो इथे. वाटेत
दोन – तीन ठिकाणी चहाच्या टपऱ्या आहेत. मस्त पैकी चहा, लिम्बी सरबत आणि मक्याची
कणस इथे मिळतात. टपऱ्या छोट्या असल्या तरीही त्याचं महत्त्व शहरातल्या मॉल पेक्षा
कमी नाही. काही मिनिटांच्या चढाई नंतर आपण एका माची वर पोहोचतो. इथे काही घरांची
वस्ती आहे. आधी सांगितल तर जेवणाची सोय इथे होवू शकते. थोड थांबत गप्पा मारत आम्ही
कलावंतीण दुर्गच्या पायथ्याशी पोहोचलो.एका बाजूला प्रबळगड आणि दुसऱ्या बाजूला
कलावंतीण. एका क्षणात त्यांना झाकून टाकणारे ढग आणि त्या ढगांमधून डोकावणारा
दुर्ग. निसर्गाशिवाय हे कोणालाही शक्य नाही.
कलावंतीणच्या पायऱ्या
चढताना खूपच उत्साह होता. फोटोमध्ये दिसतो त्यापेक्षा हा दुर्ग सर करणे कठीण नाही.
मात्र शेवटच्या सुळक्यावर जाताना सुरक्षा साधने असणे आवश्यक आहे. “टीम सुमेरू” ने
अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येक मेम्बेर्सना सुळक्यापर्यंत पोहोचवलं. जवळ जवळ एक तास
आम्ही सुळक्यावर होतो. पाऊस, वारा, मधेच येणारे ढग हे सर्व अंगावर घेत आम्ही सभोवतालचा
परिसर न्हाहाळत होतो. प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर गड सर केल्याचा आनंद दिसत होता. विजय
वणेकर हे त्यांच्या सेल्फी मुळे ओळखले जातात. त्यांच्या सोबत सेल्फी काढताना खूप
मजा आली.
"काही सेल्फी असेही"
![]() |
| कलावंतीण सुळका |
काही सूचना पनवेल पासून ठाकूरवाडी जाण्यासाठी
टमटम मिळतात किवा कारने जाता येते.
- पनवेल पासून ठाकूरवाडी अंतर १६ किमी.
- ग्रुपमध्ये हा ट्रेक करण कधीही चांगले.
- जेवणाची सोय खाली गावामध्ये होवू शकते.
- सुळक्यावर जाण्यासाठी अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शक हवा.
- सुरक्षा साधनाशिवाय सुळक्यावर जाणे धोकादायक ठरू शकते.
ट्रेक करा ! फिट रहा
!!












